रुपाली चाकणकर यांचा राजीनामा

मुंबई : राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.  गेल्या विधानसभा निवडणुकीआधी चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यानंतर महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पद रिकामे झाले होते. त्यानंतर रुपाली चाकणकर यांना राष्ट्रवादीकडून महिला प्रदेशाध्यक्षापद देण्यात आलं होतं.

रुपाली चाकणकर यांची काही दिवसांपूर्वीच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली होती. या पदावर नियुक्ती करण्यात आल्याने रुपाली चाकणकर यांनी एक व्यक्ती एक पद यानुसार राजीनामा दिला असल्याची माहिती समोर येत आहे.

कोण आहेत रुपाली चाकणकर

रुपाली चाकणकर यांचा जन्म दौंड येथील आहे. एका शेतकरी कुटुंबात त्या लहानच्या मोठ्या झाल्या आहेत. रयत शिक्षण संस्थेतील साधना महाविद्यालयातून त्यांनी शिक्षण पूर्ण केले असून अनेक स्पर्धा परीक्षांसाठीचा त्यांचा अभ्यास आहे, चाकणकर या शेतकरी कुटंबातील आहेत. त्यांच्या माहेरी कोणातीही राजकीय पार्श्वभूमी नाही.लग्नानंतर त्या चाकणकर कुटुंबात आल्यानंतर राजकारणात सक्रीय झाल्या. रुपाली चाकणकर यांच्या सासरी राजकीय पार्श्वभूमी असल्याने त्या देखील राजकारणात उतरल्या. नगरसेविका ते प्रदेशाध्यक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास आहे.

Share