पुण्यातील शाळा-महाविद्यालये ऑनलाईन पद्धतीने- अजित पवार

पुणे- राज्य सरकारच्या निर्णयानूसार सोमवारपासून शाळा सुरु करण्यात येणार असून त्यासाठी काही नियम व अटी लागू करण्यात आले आहेत. स्थानिक प्रशासनाला शाळा सुरु करण्या बाबतचा निर्णय घेण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आले आहेत. त्यामुळे काही ठिकाणाची कोरोना परिस्थिती पाहता शाळा सुरु करणे अशक्य आहे. यावर आता पुण्याचे पालकमंत्री अजित पवार ,महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यातील शाळांबाबत मोठा निर्णय घेतला असून शहरातील शाळा महाविद्यालये बंद राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

 

कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेवून पुण्यातील शाळा महाविद्यालये बंदच ठेवण्याचा निर्णय आज झालेल्या पालकमंत्र्यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे.पुढील बैठकीत कोरोनाचा आढावा घेऊन याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

राज्यातील सर्व शाळा सोमवारपासून सुरू होणार असल्याचं शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात घोषणा केली खरी , परंतू शाळांचा निर्णय स्थानिक पातळीवरील प्रशासनाकडे सोपवण्यात आला आहे. त्यानुसार पुण्याच्या महापौरांनी शाळा सुरू करण्यास नकार दर्शवला आहे. गेल्या चोवीस तासात पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना रूग्ण सापडल्याने शाळा आॉनलाईन पध्दतीने सुरू ठेवावी अशी घोषणा आज झालेल्या बैढकीत करण्यात आली. रुग्णसंख्या कमी होईपर्यंत हीच नियमावली राहणार असल्याचं महापौरांनी म्हंटल आहे. पुढील बैठकीत कोरोना रुग्णसंख्येचा आढावा घेत नियमावली शिथील करून शाळांबाबतचा निर्णय घेण्यात येवू शकतो अशीही शक्यता मोहोळ यांनी व्यक्त केली .

Share