इटलीच्या राष्ट्रपतीपदी सर्जियो मातारेला यांची निवड

रोम- इटलीच्या राष्ट्रपतीपदी सर्जियो मातारेला यांची दुसऱ्यांदा निवड झाली आहे. मातारेला हे पहिल्यांदा २०१५ मध्ये राष्ट्रपती झाले होते. आता त्यांना दुसऱ्यांदा सात वर्षांच्या कार्यकाळासाठी  निवड करण्यात आली आहे. मातारेला यांना निवडण्यापूर्वी राष्ट्रपतीपदासाठी सात वेळेस मतदान झाले. मात्र कोणत्याही नावावर सहमती झाली नाही. एकूण १ हजार ९ मतांपैकी त्यांना ७५९ मते मिळाली आणि त्यांच्या नावावर शिक्का मोर्तब करण्यात आला.८० वर्षांचे मातारेला पुन्हा राष्ट्रपती होण्यास इच्छुक नव्हते. तसेच अनेक वेळेस पुन्हा निवडणूक लढवण्यास तयार नसल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र जेव्हा इटलीतील राजकीय पक्षांमध्ये एकाही नावावर सहमती न झाल्याने सर्जियो यांना राष्ट्रपती म्हणून निवडण्यास सहमती झाली.

 

२०१५ मध्ये राष्ट्रपती म्हणून कार्यकाळास सुरुवात करताना मातारेला म्हणाले, माझ्या काही वेगळ्या योजना होत्या. मात्र माझी आवश्यकता आहे तर मी उपलब्ध आहे. इटलीत राष्ट्रपतीचा कार्यकाळ सात वर्षांचा असतो. मातारेला हे आपला दुसरा कार्यकाळ पूर्ण करु शकणार नाही, असे सांगितले जाते. तरी एक आशा आहे की ते २०२३ मध्ये होणाऱ्या संसदीय निवडणुकापर्यंत थांबतील.

Share