कोल्हापूर : सत्तेविना भाजप राहू शकत नाही, म्हणून त्यांनी पडेल ती किंमत देऊन शिवसेना फोडली असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं. मात्र, कोणावर तरी खापर फोडायचं म्हणून राष्ट्रवादीचं नावं घेतलं जातं आहे. शिवसेना फोडण्याचं पाप भारतीय जनता पक्षाचं आहे. हिंदुत्वाची मतं जातील आणि आपल्याला सत्तेत येता येणार नाही यातूनच भाजपनं पक्ष फोडल्याचे पाटील म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडी सरकार चालवण्यासाठी चांगली साथ दिली. पवारसाहेबांनीचं पुढाकार घेऊन या महाविकास आघाडीची स्थापना केली होती. त्यामुळं या विरोधी काही करण्याचा प्रश्न येत नाही. मात्र, शिवसेना फोडल्याचे खापर कोणावर तरी फोडायचं म्हणून भाजपकडून राष्ट्रवादीचं नावं घेतलं जातं असल्याचे जयंत पाटील म्हणाले. महाराष्ट्रभर शिवसेनेच्या आमदारांशी आमचे चांगले संबंध आहेत. उद्धव ठाकरेंच्या घरातील शिवसेना चोरीला गेली आहे, ती कोणाच्या घरी आहे हे थोड्या दिवसांनी कळेल असा टोला देखील पाटील यांनी भाजपला लगावला.
शिवसेनेमधील बंडाळी ही शिवसेनेची नसून भारतीय जनता पक्ष प्रणीत होती. भाजप जास्त वेळ सत्तेविना राहू शकत नाही त्यामुळे पडेल ती किंमत देऊन त्यांनी शिवसेना फोडली आहे, असे परखड मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. @Jayant_R_Patil यांनी व्यक्त केले आहे. pic.twitter.com/e2YF8HgTIX
— NCP (@NCPspeaks) October 12, 2022
दरम्यान, शिवसेनेची बंडाळी ही शिवसेनेची कधीच नव्हती, ती भाजपप्रणित होती असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले. शिवसेना फोडण्यात भाजपचा हात असल्याचे यातून स्पष्ट होतं असल्याचे पाटील म्हणाले. ज्याला उमेदवारी दिली आहे त्याला साम, दाम, दंड, भेद वापरुन फोडणे योग्य आहे का? असा सवालही पाटील यांनी उपस्थित केला.