मार्च महिन्यात सुरू झालेल्या उन्हाळ्याची तीव्रता एप्रिल आणि मे या महिन्यात वाढतच जाते.शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे,अशक्तपणा वाढणे,काम कमी केले तरी जास्त दमायला होणे तसेच घामावाटे पोषक द्रव्ये शरीराबाहेर टाकली जाणे ह्या बाबींची देखील सुरुवात होते. तापमान बदल व वाढत्या उष्णतेमध्ये पुरेशी काळजी घेतली नाही तर उन्हाळ्यामुळे उद्भवणार्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यावर ते पुन्हा पुर्ववत आणण्याची क्षमता या वयोगटातील लोकांमध्ये कमी असल्याने परिणाम जास्त दिसून येतात. त्यात उघड्यावरील किंवा अस्वच्छ अन्न,द्रवपदार्थ खाण्या-पिण्यात आले की पचनाशी संबंधित आजार उद्भवतात.विशेेष करून अतिसार.त्याचे कारण असे की,अस्वच्छ किंवा दूषित अन्नावर विषाणू,जीवाणू हे जास्त वेळ टिकून राहतात.यामुळे सर्व वयोगटातील लोकांवर याचा प्रभाव पडू शकतो.विशेष करून पाच वर्षांखालील बालके आणि साठ वर्षावरील लोकांमध्ये याचा जास्त परिणाम जाणवतो. उन्हाळ्यामुळे उद्भवणार्या समस्यांमध्ये प्रामुख्याने अतिसारासारखे पचनक्रियेशी संबंधित आजार आणि हीट स्ट्रोक यांचा समावेश असतो.याशिवाय त्वचेसंदर्भात समस्या देखील उद्भवतात.जशी उष्णता वाढते तशी पचनक्रिया मंदावू शकते.त्याशिवाय वारंवार बाहेरचे खाणे हा शहरी जीवनशैलीमधील एक नियमित भाग झाला आहे.
म्हणून उन्हाळ्यात प्रत्येकानं आपापली काळजी कशी घ्यायची, याच्या काही टीप्स-
१. भरपुर पाणी पिणे.
२. उन्हात जातांना आवर्जून डोके झाकणे.
३. गॉगल्स वापरणे.
४. घाम शोषुन घेतील असे कपडे वापरणे.
५. शक्य असेल तर दोनदा अंघोळ करणे.
६. जवळ ग्लुकॉन डी किंवा इलेक्ट्रॉल पावडर बाळगणे.
७. रबरी चपला/ सँडल्स न वापरणे.
८. वातावरणातील उष्णतेमुळे अन्न लवकर नासत/ आंबत असल्याने डबा खातांना भाजी चांगली आहे ना याची खात्री करून खाणे.
९. एसीमध्ये काम करणार्यांनी एसीतून बाहेर आल्यावर एकदम उकाड्याने गरगरल्यासारखे होते त्यावर काहीतरी उपाय करणे.
१०. चहाचे प्रमाण कमी करून कोकम, लिंबू, पन्हे अश्या सरबतांचे सेवन वाढवणे. नारळपाणी व ताक यांचे नियमित सेवन करणे.
११. बाहेर जाताना सहसा कॉटनचा सनकोट घालणे.. शक्य असल्यास हातात ग्लोव्हज् घालणे..
१२. उन्हातुन आल्यावर लगेच कुलर अथवा एसी मधे जाऊन बसु नये.
१३. उन्हातुन थकुन आल्यावर लगेच गारेगार पाणि पिउ नये.
१४. रोज एक चमचा गुलकंद खाणे ,
१५. रात्री झोपताना तळपायाला तेलाने अभ्यंग करणे.
१६. उन्हाळ्यात जंकफूड खाणं टाळावं. (खरं तर शक्य होईल तितके सर्वच महिन्यात टाळावे).
१७. सनस्क्रीन ( 30 SPF किंवा त्यापेक्षा जास्त) लावुनच उन्हात बाहेर पडावे.