मुंबई : राज्यसभेच्या ६व्या जागेवर शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव करत भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांनी विजय मिळवला. राज्यसभेच्या निवडणूकीच भाजपचे तिन्ही उमेदवार विजयी झाल्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनते देवेंद्र फडणवीस यांनी विजयाबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस यांनी ट्विट केलं आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट मध्ये म्हणताता, निवडणूक केवळ लढवण्यासाठी नाही, तर जिंकण्यासाठी लढवली होती, असं फडणवीस म्हणाले.
निवडणूक केवळ लढविण्यासाठी नाही,
तर जिंकण्यासाठी लढविली होती…
जय महाराष्ट्र ! #RajyaSabhaElections2022 #Maharashtra— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 10, 2022
दरम्यान, भाजपचे संख्याबळ १२३ इतकी झाले होते. राज्यसभेचे दोन उमेदवार निवडून आणल्यानंतर भाजपकडे २८ मते राहत होती. पण, पियूष गोयल यांना ४८ मतं मिळाली आणि अनिल बोंडे यांनाही ४८ मतं मिळाली. त्यानंतर पहिल्या पसंतीची २७ मतं ही धनंजय महाडिक यांना मिळाली आहे.तर महाडिक यांच्याविरोधात उभे असलेले शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांना ३३ मतं मिळाली आहे. त्यामुळे अपक्षांची ९ मतं फुटली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. धनंजय महाडिक हे ४१ मतं घेऊन विजयी झाले आहे. तर संजय पवार यांना ३३ मतं मिळाली आहे.