‘…तर घर गाठणं कठिण होईल’, नारायण राणेंचा शरद पवारांना थेट इशारा

मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापताना दिस आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या बंडखोर आमदारांना बहुमत सिध्द करण्यासाठी मुंबईत यावेच लागेल असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांशी बोलत केलं. यावर आता भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ट्विट करत पवारांवर निशाणा साधला आहे. आमदारांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठिण होईल, असा इशारा राणे यांनी दिला आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे आपल्या ट्विट म्हणतात, “माननीय शरद पवार साहेब या सर्वांना धमक्या देत आहेत, ‘सभागृहात येऊन दाखवा’, ते येणारच आहेत. ते येणार आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार. त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठिण होईल,” असं ट्विट राणेंनी केलं.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार टिकणार की नाही हे विधानसभेतील बहुमत ठरवेल आणि सरकार विधानसभेमध्ये बहुमत सिद्ध करेल असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला. यादरम्यान त्यांनी बंडखोर आमदारांना त्यांचे बहुमत सिद्ध करण्यासाठी इकडे यावेच लागेल, तसेच आमदारांना बंडोखोरीचे परिणाम भोगावे लागतील असेही शरद पवार म्हणाले. या वक्तव्यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ट्वीट करत थेट इशारा दिलाय.

Share