हिंमत असेल तर उद्धव ठाकरेंनी बुलढाण्यातून निवडणूक लढवावी

बुलडाणा : उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी बुलढाणा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवावी, असं खुलं आव्हान शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी दिलं आहे. उद्धव ठाकरे यांनी चिखली येथील शेतकरी सभेमध्ये शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यांच्या या टिकेला प्रतापराव जाधव यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

प्रतापराव जाधव म्हणाले की, हिंमत असेल तर उद्दव ठाकरेंनी माझ्या विरोधात बुलढाण्यातूव लोकसभा निवडणूक लढवावी असे जाधव म्हणाले. मी पुढची लोकसभा निवडणूक शिवसेनेतूनच लढणार आहे. भाजकडून लढण्याचा विषय येतो कुठे. आम्ही शिवसेनेतच आहोत. बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललो असल्याचे प्रतापराव जाधव म्हणाले.

भाजप आमचा जुना मित्रपक्ष आहे. जुन्या मित्रपक्षाला सोबत घेऊन आम्ही याआधीच्या सर्व निवडणुका लढवल्या आहेत आणि इथून पुढं येणाऱ्या सगळ्या निवडणुका देखील आम्ही भाजपसोबतच लढणार असल्याची माहिती यावेळी प्रतापराव जाधव यांनी दिली. त्यामुळं भाजपकडून लढण्याचा प्रश्न येतो कुठं? असा सवाल प्रतापराव जाधवांनी केला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच गजानन कीर्तिकर यांच्यानंतर ठाकरे गटाचे तीन खासदार शिंदे गटाच्या संपर्कात आहे. आम्ही लोकांमध्ये राहणारे आहोत. आणखी काही लोक आमच्या संपर्कामध्ये आहे. पण काही स्थानिक अडचणी आहे, जिल्ह्यातील काही काम आहे. नेतृत्वावर प्रेम आहे म्हणून ते तिकडे थांबलेले आहे. जशा निवडणुकासमोर येतील शिवसेनेचे घर खाली झालेले असेल, असा दावा प्रतापराव जाधव यांनी केला होता.

Share