“लोक झोपेत असताना तुम्हीच…”,भाजपचा पुणे मेट्रोवरून टोला

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यातील मेट्रो प्रकल्पासह इतर प्रकल्पांच्या  प्रकल्पांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा आहे. या दौऱ्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शदर पवार यांनी भाजपवर टिका केली होती. त्याला आता भाजपकडून ट्विटर हँडलवरून शरद पवारांना पवारांवर निशाणा साधला आहे.

भाजपाच्या महाराष्ट्रच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून म्हटंल आहे की, आदरणीय शरद पवार जी, पुणे मेट्रोच काम अर्धवट आहे तर, लोकं झोपेत असताना लपून छपून ट्रायल तुम्हीच घेतलं होतं ना? आदरणीय तुमची अडचण इथे आहे की, “मोदीजी ज्या प्रकल्पाचे भूमिपूजन करतात त्या प्रकल्पाचे लोकार्पण देखील करतात, जे तुम्हाला ५० वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत जमलं नाही” असं भाजपनं म्हटलं आहे.

काय म्हणाले होते शरद पवार?

काल पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमामध्ये शरद पवार यांनी बोलताना पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्याचा उल्लेख केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येऊन मेट्रोचं उद्घाटन करत आहेत. कामं होत असतील आणि त्यांचं द्घाटन होत असेल तर त्यावर तक्रार असण्याचं कारण नाही. ते मेट्रो सुरू करतायत. मला माहिती नाही. महिन्यापूर्वी मेट्रोच्या प्रमुखांनी मला मेट्रो दाखवायला नेलं होतं. पंतप्रधान ज्या मार्गाने जाणार आहेत, त्या रस्त्याने मी देखील गेलो. आमचे काही सहकारी होते. माझ्या लक्षात आलं की हे मेट्रोचं काम काही सगळं झालेलं नाही. मला नुसतं दाखवलं. काम झालं नाही तरी उद्घाटन होत आहे. माझी काही त्याबद्दल तक्रार नाही”, असं शरद पवार म्हणाले होते.

 

 

 

 

Share