पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त? जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. आजही देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. गेल्या वेळी केंद्रातील मोदी सरकारने २१ मे रोजी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले होते. यानंतर देशभरात पेट्रोल ९.५० रुपयांनी तर डिझेल ७ रुपयांनी स्वस्त झाले आहे. केंद्र सरकारच्या निर्णयानंतर राजस्थान, झारखंड आणि महाराष्ट्रातील राज्य सरकारांनीही व्हॅट कमी करून जनतेला दिलासा दिला आहे.

राज्यातील महत्त्वाच्या शहरांतील दर काय ?
महाराष्ट्रातील मुंबई शहरात गुरुवारी पेट्रोलचा दर १०६.२५ रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर ९४.२२ रुपये प्रति लिटर आहे. तसेच, पुण्यात पेट्रोलचा दर प्रति लिटर १०५ रुपये तर डिझेलचा दर ९२ रुपये प्रति लिटर आहे. नाशिकमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर १०६.७४ रुपये तर डिझेलचा दर ९३.२३ रुपये प्रति लिटर आहे. नागपुरात पेट्रोलचा दर प्रति लिटर १०६.२३ रुपये तर डिझेलचा दर ९२.५८ रुपये प्रति लिटर आहे.

पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकरे तपासा

इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून ९२२४९९९२२४९ या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल.

Share