मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जीएसटीच्या मुद्यावरून महाविकास आघाडीवर जोरदार टिका केली आहे. केंद्राने जीएसटीचा पैसा अडविल्याचा आरोप महाविकास आघाडी सरकारकडून सातत्याने होत असतो. अशात काल केंद्राने महाराष्ट्र सरकारला मोठा दिलासा आहे. यावरून फडणवीसांनी ट्विट करत महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट मध्ये म्हटलं की, ३१ मे २०२२ पर्यंतचा जीएसटी, जानेवारीपर्यंतच्या कम्पेन्सेशनसह संपूर्ण रक्कम केंद्र सरकारने काल सर्व राज्यांना दिली आहे. यात महाराष्ट्राला सर्वाधिक १४,१४५ कोटी रुपये जमा झाले आहेत. आता तरी पेट्रोल-डिझेलचे दर महाराष्ट्रात कमी करणार की पुन्हा आज १ जूनपासूनचे शिल्लक दाखवून केंद्रावर खापर फोडत धन्यता मानणार, असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला लगावला.
31 मे 2022 पर्यंतचा जीएसटी, जानेवारीपर्यंतच्या कम्पेन्सेशनसह संपूर्ण रक्कम केंद्र सरकारने काल सर्व राज्यांना दिली.
यात महाराष्ट्राला सर्वाधिक ₹14,145 कोटी
आता तरी पेट्रोल-डिझेलचे दर महाराष्ट्रात कमी करणार की पुन्हा आज 1जूनपासूनचे शिल्लक दाखवून केंद्रावर खापर फोडत धन्यता मानणार❓ pic.twitter.com/H0JPPdWsII— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 1, 2022
तसेच राज्य सरकार म्हणून कर्तबगारी दाखविण्याची वेळ जेव्हा-जेव्हा महाविकास आघाडीवर आली. तेव्हा प्रशासनाची ‘ढकलगाडी’ करण्यातच महाविकास आघाडीने धन्यता मानली. केंद्रावर दोषारोप हाच पुरूषार्थ समजण्याची चूक आणखी किती काळ करणार?, आतातरी पेट्रोल डिझेलचे दर महाराष्ट्रात तत्काळ कमी करा, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.