भारताचा बांगलादेशवर ११० धावांनी दणदणीत विजय

आंतरराष्ट्रीय-  भारताने बांगलादेशवर ११० धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. भारताने बांगलादेशसमोर विजयासाठी २३० धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र बांगलादेशला सर्वबाद ११९ धावाच करता आल्या. या विजयासह भारत धावफलकात तीन विजयांसह ६ गुण मिळत तिसऱ्या स्थानावर पोहचला आहे. भारताचा रनरेट +०.७६८ इतका आहे. भारताचा साखळी फेरीतील शेवटचा सामना २७ मार्चला दक्षिण अफ्रिकेसोबत असणार आहे.

महिला विश्वचषक २०२२ मध्ये उपांत्य फेरीची लढत रंगतदार वळणावर आली आहे. आयसीसी एकदिवसीय विश्वचषकात प्रत्येक संघाचे साखळी फेरीत सात सामने होणार आहेत. साखळी फेरीत ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत खेळलेल्या ६ पैकी ६ सामन्यात विजय मिळवत उपांत्य फेरीत स्थान निश्चित केलं आहे. मात्र इतर तीन संघांबाबत संभ्रम कायम आहे. पाकिस्तानने वेस्ट इंडिजला पराभूत केल्याने उपांत्य फेरीची गणितं बदलली आहेत. त्याचबरोबर भारताच्या उपांत्य फेरीच्या आशा कायम आहेत.

भारतीय संघ: स्मृती मंधाना, शेफाली वर्मा, यस्तिका भाटिया, मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर, रिचा घोष, पूजा वस्त्राकार, स्नेह राणा, झुलन गोस्वामी, पूनम यादव, राजेश्वरी गायकवाड

बांगलादेश संघ: शरमीन अक्तर, मुर्शिदा खातुन, फरगाना होक, निगर सुलताना (कर्णधार), रुमाना अहमद, रितु मोनी, लता मोंडल, सलमा खातुन, नहिदा अक्तर, फहिमा खातुन, जहानारा आलम

Share