मुंबईः विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस ह्या सोशल मीडिया वर नेहमीच चर्चेत असतात. यांचे अनेक गाणे प्रदर्शित आहेत. त्यांनी व्हॅलेंटाइन दिन निमित्तानं आणखी एक गाण प्रदर्शित केल आहे. व्हॅलेंटाइन दिनाच्या निमित्ताने प्रदर्शित झालेले हे एक रोमँटिक गीत असून अमृता यांनी स्वत:या गाण्याचा व्हिडिओ ट्वीट केला आहे. नेटिझन्सनी या गाण्यावरून त्यांची जोरदार खिल्ली उडवली आहे.
'ये नयन डरे डरे' या गाण्याच नाव आहे. हे गाण दिग्दर्शक आशिष पांडा यांनी बनवल आहे. व्हॅलेंटाइनडेच्या निमित्ताने अमृता यांनी खास त्यांच्या चाहत्यांसाठी हा व्हिडिओ शेअर केला आहे. या रोमँटिक गाण्याचा अनुभव छान होता, असे त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.
Presenting for u only 🌹with lots of 💕"Ye Nayan Dare Dare'-magical mesmerising melodious masterpiece of @saregamaglobal ! All through this romantic song, I enjoyed being my own valentine & believe me it was freaking amazing! Watch 👉https://t.co/p342uSKcPJ #valentinesday2021 pic.twitter.com/C3Zd6mih5G
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) February 14, 2021
गेल्या २४ तासात हा नवीन व्हिडीओ ४५ हजार ५३१ लोकांनी पाहिला आहे. त्यावर नेटिझन्सीने कमेंट केल्या आहेत. 'आज का सबसे गजब व्हिडिओ. लोकांच्या कानांना भावपूर्ण श्रद्धांजली. आता ट्विटर बंद होणार' अशा प्रतिक्रिया येत आहेत. 'मामी तुमच्या छंदाचा आम्ही आदर करतो, पण जबरदस्ती तो कोणावर लादू नका..' असेही काहींनी म्हटलेय. अमृता यांच्या काही चाहत्यांनी मात्र या प्रयत्नाचे स्वागत केले आहे. काहींनी तर अमृता यांचे कौतुकही केले आहे.