अजित आगरकरांना अध्यक्षपद !

भारताचा माजी वेगवान गोलंदाज ‘अजित आगरकर’ याची बीसीसीआय चे सचिव जय शाह यांनी पुरुष संघाच्या निवडीचे प्रमुख बनवले आहे . बीसीसीआय हा निर्णय एक आठवड्याआधीच घेतल्याचे समजते . अजित यांना १ कोटी पेक्षा अधिक वार्षिक वेतन देखील यामाध्यमातून मिळणार आहे .

४५ वर्षाचे अजित यांनी माजी अध्यक्ष चेतन शर्मा यांचा पदभार स्वीकारला आहे . एका स्टिंग ऑपेरेशन नंतर शर्मा यांची हकालपट्टी बोर्डाने केली होती . फिटनेस साठी भारतीय खेळाडू इंजेकशन घेत असल्याचा दावा त्यांनी केला होता .

आगरकर यांनी १९१ एकदिवसीय , २६ कसोटी आणि ४ टी -२० सामने खेळले आहेत . १९९९ ,२००३ ,२००७ या विश्वचषकात ते भारतीय संघाचे खेळाडू असून २००७ च्या विश्वचषक विजेत्या संघात देखील त्यांचा समावेश होता . लॉर्ड्सवरील शतक असू कि अडिलेड मधील त्यांची दिमाखदार कामगिरी असो त्यांनी नेहमीच संघासाठी महत्वाची जवाबदारी बजावली आहे .
नव्या निवड समितीत शिवसुंदर दास , सलील अंकोला , सुब्रतो बॅनर्जी आणि श्रीधरन शरद यांचाही समावेश आहे. आगामी विंडीज दौर्यासाठीची निवड हे आगरकर’ न मंडळींसमोरील पहिले आव्हान असेल .

Share