जात विचारून घर नाकरणाऱ्या बिल्डर विरुध्द अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

औरंगाबाद- शहरातील एका बिल्डरने संबंधित व्यक्तिला जात विचारत घर नाकारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकिस आला आहे. २१ व्या शतकातही असा प्रकार घडला आहे त्यामुळे हे वर्तण धक्कादायक आहे. या प्रकारणी पेशाने वकिल असलेले अ‍ॅड. गंडले यांनी बिल्डर आणि तेथील कर्मचाऱ्यांविरूध्द अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.

शहरातील पेशाने वकिल असलेले अॅड.गंडले हे परिवारा समावेत शहरा लगत असलेल्या हिरापूर भागातील एक बांधकाम व्यावसायिकाच्या साईटला भेट देण्यासाठी गेले होते. तेव्हा तेथे त्यांना जात विचारण्यात हा प्रकार विचित्र वाटला. बरं बिल्डरची माणसं एवढ्यावच थांबली नाही तर संबंधित व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबाला घर दाखवण्यास देखील टाळाटाळ केली. त्यामुळे गंडले यांनी बिल्डरला अद्दल शिकवण्याचे ठरवून संबंधित बिल्डर आणि त्यांच्याकडे कामावर असणाऱ्या संबंधित सहा जणांवर चिकलठाणा पोलिस स्टेशनमध्ये अट्राॅसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.

Share