डान्सिंग गर्ल, नोरा फतेहीलाही कोरोनाची लागण

मुंबईः बॉलिवूड मध्ये कोरोनाचा कहर वाढतांना दिसत आहे. काल कपूर कुटूंबात कोरोनाचा शिरकाव झाला. आज अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेहीला कोरोनाची लागण झाली आहे. तिने स्वतःला घरात क्वारंटाईन केले आहे.नुकतीच तिने सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना माहिती दिली आहे.

नोरा फतेहीच्या प्रवक्त्याने माध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘नोरा फतेही २८ डिसेंबर रोजी झालेल्या तपासणीत कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आली आहे. नोरा कोरोनाचे सर्व प्रोटोकॉल पाळत आहे आणि या अंतर्गत तिने डॉक्टरांच्या सूचनेनुसार स्वतःला क्वारंटाईन केले आहे. सुरक्षा आणि सतर्कतेच्या दृष्टीने नियमानुसार, ती BMC ला पूर्ण सहकार्य करत आहेत.’

Share