‘द ऍशेस ‘ मालिकेदरम्यान गदारोळ !

द ऍशेस ही इंग्लंड व ऑस्ट्रेलिया ह्या दोन देशांदरम्यान खेळली जाणारी ऐतिहासिक कसोटी क्रिकेट मालिका आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ही सर्वात जुनी व मानाची मालिका मानली जाते. सर्वात पहिली ऍशेस मालिका १८८२-८३ साली ऑस्ट्रेलियामध्ये खेळवली गेली. सध्या ऍशेस दोन वर्षातून एकदा खेळवली जाते व दोन्ही देश आलटुन पालटुन ह्या मालिकेचे आयोजन करतात. सर्वसाधारणपणे ऍशेस मालिकेत ५ कसोटी सामने असतात. जर मालिका बरोबरीत सुटली तर मागील विजयी टीमकडे ऍशेसचा चषक राहतो. ह्या मालिकेला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे.

नुकत्याच झालेल्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने पुन्हा विजय मिळवत २-० अशी आघाडी बनवली आहे . मात्र हा सामना चर्चेत राहिला तो वेगळ्या कारणास्तव !
हा सामना लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानात खेळला गेला . दरम्यान सामन्याच्या ५व्या दिवशी इंग्लंडचा बेयरस्टो फलदांजी करत असताना वेगळा थरार पाहायला मिळाला . ओव्हर चा शेवटचा चेंडू फलंदाजाने आदरपूर्वक सोडत यष्टिरक्षकाकडे गेला व बेयरस्टो ओव्हर संपली समजून समोरील फलंदाजाकडे गेला तितक्यात ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षक अलेक्स कॅरीने त्याला धावबाद केले .

या धावबाद / यष्टिचितनंतर मैदानात उपस्थित असलेल्या इंग्लंड संघाच्या चाहत्यांचा राग ऑस्ट्रेलियन संघावर स्पष्ट दिसत होता . नंतर लाँग रूममधून बाहेर पडताना एमसीसी सदस्य ऑस्ट्रेलियन फलंदाज वॉर्नर व ख्वाजा यांच्याशी वाद घालताना दिसून आले . या गदारोळानंतर त्या तिन्ही सदस्यांना निलंबित करण्यात आले.

Share