समान नागरी कायदा म्हणजे काय ? काय होतील बदल ?

समान नागरी कायद्याचा वाद भारतात अनेक वर्षांपासून चालत आलाय. या कायद्याच्या समर्थनातील लोकांचं म्हणणंय की, कायदा असायला हवा, मग ते कुठल्याही धर्माचे का असोत.समान नागरी कायदा म्हणजे कॉमन सिव्हिल कोड किंवा यूनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करण्याचे मोदी सरकारचे प्रयत्न असतील, अशी चर्चा गेल्या वर्षापासून आहे.

 

समान नागरी कायदा लागू झाल्यास लग्न, तलाक आणि संपत्तीचं वाटपही समसमान होईल आणि हीच मोठी अडचण आहे.यूनिफॉर्म सिव्हिल कोडचा अर्थ म्हणजे एक निष्पक्ष कायदा ज्याचा कुठल्याही धर्माशी सबंध नाही. म्हणजेच, जर समान नागरी कायदा लागू झाला, तर सर्व धर्मांना एकसारखाच कायदा असेल.

तसेच हा कायदा आमलात आणल्यानंतर विवाहासाठी मुलींचे वय वाढविले जाईल , घटस्फोट घेण्याच्या पती पत्नीला सामान अधिकार राहील , वारसदार म्हणून मुलगा मुलगी दोघांना सामान अधिकार ,तसेच मुस्लिम महिला अनाथांना दत्तक घेऊ शकतील, एकापेक्षा जास्त विवाह बंदी , हलालावर बंदी , जर न विवाह करता एकत्र राहायचा असेल तर तसं घोषित करावं लागणार…

Share