महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कालीचरण महाराजांना अखेर अटक

रायपूरः राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कालिचरण महाराजला अखेर अटक करण्यात आली आहे. महाराजाविरोधात छत्तीसगड, महाराष्ट्रात गुन्हे दाखल करण्यात आले होते. छत्तीसगडमधील रायपूर पोलिसांनी ही कारवाई केलीय. कालीचरण महाराजाविरोधात तिक्रपरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल गुन्ह्यानुसार पोलिसांनी कारवाई करत कालीचरण महाराजला मध्यप्रदेशमधील खजुराहोमधून पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अटक करण्यात आली.

Share