संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तारखा जाहीर, दोन टप्यात अधिवेशन

नवी दिल्लीः संसंदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन टप्यात पार पडणार आहे. ३१ जानेवारीपासून अधिवेशनाला सुरुवात होईल. ११ फेब्रुवारीला अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा अधिवेशनाचा पहिला टप्पा पार पडेल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील अधिवेशन १२ मार्चला सुरु होणार आहे. तर, ८ एप्रिला अधिवेशनाची समाप्ती होईल.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण या १ फेब्रुवारीला बजेट सादर करतील, अशी माहिती आहे. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ससंदेतील अधिकारी आणि कर्मचारी कोरोनाबाधित आढळून आले होते. संसदेतील जवळपास ४०० कर्मचारी कोरोनाबाधित झाले होते. मंगळवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संसदेची पाहणी केली होती. नरेंद्र मोदी सरकार या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला दिलासा देणार का हे पाहाव लागणार आहे.पाच राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे अर्थसंकल्पीय अधिवेशन अत्यंत महत्वाचे असणार आहे. या अधिवेशनात सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात या पाच राज्यांसह अन्य राज्यांना काय मिळणार? याकडे लक्ष लागून आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने हे अधिवेशन दोन टप्प्यात होत असल्याची माहिती आहे. देशात कोरोनाचे रुग्णांची आकडेवारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत काळजी घेत हे अधिवेशन घ्यावे लागणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनावर वाढत्या कोरोनाचे सावट आहे. त्या पाश्वर्वभूमीवर राज्यसभेचे अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दोन्ही सभागृहांच्या महासचिवांना कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या सद्य परिस्थितीचा आढावा घेऊन अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरक्षित पार पाडण्यासाठी प्रभावी उपाययोजना सुचवण्याचे निर्देश दिले आहेत.

Share