अजित दादांचं वादळी भाषण !

उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर आज प्रथमच मुंबईत अजित पवारांनी जनतेसमोर आपल मन मोकळ केलं. त्यांनी आजवर घेतलेले निर्णय , झालेले आरोप यावर खडखडीत आपली बाजू मांडली . पहाटेला घेतलेला शपथविधी या मध्ये वरिष्ठ सहभागी होते असं म्हणत त्यांनी शरद पवारांकडे बोट दाखवलं .

“आम्ही पोटी जन्माला नाही आलो , हि काय आमची चूक..? ” असं म्हणत त्यांनी सुप्रियाजींना भेटत असलेला प्रथम पणा यावर टीका केली . तसेच शरद पवारांनी रिटायर व्हावं यासाठी त्यांनी शासकीय नोकरी निवृत्तीची ‘६०’ अशी वयोमर्यादा सांगितली .

तसेच भारतीय जनता पार्टी मध्ये ७५ ला निवृत्ती घेतात असं म्हणत त्यांनी लालकृष्ण आडवाणींच उदाहरण घेतलं. तसेच हट्टीपणा न करता आराम करून माझ्यासारख्या पुढील पिढीला मार्गदर्शन करावं , निर्णयाचं स्वागत करून आशीर्वाद द्यावा व मला अजून बोलायला भाग पडू नये अशी विनंती देखील शरद पवारांना केली .

नरेंद्र मोदींशिवाय २०२४ मध्ये पर्याय नाही असं म्हणत अजित पवारांनी त्यांचं कौतुक केलं . राज्याचं प्रमुख होऊन महाराष्ट्र राज्य सर्व क्षेत्रात अग्रेसर करू अशी इच्छा त्यांनी यावेळेस व्यक्त केली .

Share