आजच्या दिवशी इस्रोने केले होते आर्यभट्टचे प्रेक्षपण

प्राचीन भारतातील थोर गणित तज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ ‘आर्यभट्ट’ यांच्या नावाने भारताने ३६० किलो वजनाचा पहिला उपग्रह आजच्या दिवशी म्हणजे १९ एप्रिलला १९७५ मध्ये प्रक्षेपित केला होता.‘इस्रो’ची ही पहिली मोहीम होती. हा उपग्रह पाच दिवसच कार्यरत होता कारण या उपग्रहाच आयुष्य काही दिवसांच होते. पाच दिवस पृथ्वी भोवती  प्रदक्षिणा घातल्या नंतर या उपग्रहाचा इस्रोशी संपर्क तुटला.

पण या उपग्रहाने भारतात माहिती-तंत्रज्ञानांच्या क्षेत्रात क्रांतीची मशाल पेटविली. १९७५ मध्ये भारतात टीव्ही, इंटरनेट यांसारख्या सेवा नव्हत्या. पण इस्रोने अंतराळात सोडलेल्या या उपग्रहामुळे आज संपूर्ण भारतीय या अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा लाभ घेत आहेत.केवळ माहिती आणि तंत्रज्ञानच नव्हे, तर पर्यावरण, हवामान, कृषी, भूकंप, त्सुनामी यांसारख्या क्षेत्रांचीही माहिती क्षणात मिळवून देणारे स्वदेशी तंत्रज्ञान शास्त्रज्ञांनी विकसित केले आहे.

अमेरिका, चीन आणि रशिया या देशांकडे संरक्षणविषयक आणि टेहळणी करणारे उपग्रह असल्यामुळे भारतालाही अशा टेहळणी उपग्रहांची गरज भासू लागली होती कारण १९७१ मध्ये भारत-पाक मध्ये युद्ध झाल आणि ते युद्ध भारताने जिंकल.भारताच्या लष्कराला अंतराळातून टेहळणी करणाऱ्या उपग्रहाची जोड देण्याचा विचार सुरू झाला.अमेरिकेने भारताला सहकार्य न करण्याची भूमिका घेतली. परिणामी भारताला स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करावे लागले. या विकसित केलेल्या तंत्रज्ञानातून १९ एप्रिल १९७५ ला पहिला कृत्रीम उपग्रह आर्यभट्ट अंतराळात सोडण्यात आला.
त्याची संरचना विक्रम साराभाई यांनी अहमदाबाद रिसर्च सेंटरमध्येच करण्यात आली. या अंतराळ संशोधनामध्ये विक्रम साराभाई यांचे अथक परिश्रम, दूरदृष्टीचा मोठा वाटा होता. त्यावेळी भारताला क्रायोजेनिक इंजिन मिळण्यात येणार्‍या अडचण येत होती पण भारतीय शास्त्रज्ञानी हार न इंजिन मानत ते इंजिन भारतातच तयार केले.

इस्त्रोची स्थापना १५ ऑगस्ट १९६९ साली झाली होती. प्रारंभीच्या काळात इस्त्रोची उद्दिष्टे मर्यादित होती. पण अवघ्या सहाच वर्षांत ‘आर्यभट्ट’ या उपग्रहाची जुळवणी देशातील शास्त्रज्ञांनी यशस्वी करून दाखवली. इस्त्रोच्या वाटचालीचा हा पहिला टप्पा होता. ‘इन्सॅट’ उपग्रहांची मालिका कार्यरत करण्यात आली. इतकच नाही तर अतिशय कमी बजेटमध्ये ‘चांद्रयान’ आणि ‘मंगलयान’ अंतराळात सोडले आहेत.

स्वतःचा पहिला उपग्रह रशियाच्या मदतीने पाठवणाऱ्या भारताने आतापर्यंत २० देशांचे ५१ उपग्रह प्रक्षेपित करून ५०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. अ‍ॅस्ट्रोसेटच्या यशस्वी प्रक्षेपणाने जागतिक अवकाश संशोधनाच्या क्षेत्रातही नवा इतिहास रचला गेला आहे. (पी. एस. एल. व्ही.) प्रक्षेपकातून २०१० मध्ये एकाच वेळी दहा उपग्रह अवकाशात यशस्वीपणे प्रक्षेपित करायचा नवा इतिहासही इस्त्रोच्या नावे आज आहे. इंग्लंड, अमेरिका, रशिया, फ्रान्स या देशांची अवकाश संशोधनाच्या क्षेत्राची मक्तेदारी भारताने मोडून तर काढलीच, पण या क्षेत्रात दबदबाही निर्माण केला. ज्या अमेरिकेने हे तंत्रज्ञान द्यायला आपल्याला नकार दिला होता, त्याच अमेरिका आणि ब्रिटनसह काही देशांचे एकूण ११ उपग्रह भारताने अवकाशात सोडले.

 

Share