ओबीसी आरक्षणाची न्यायालयीन जबाबदारी भुजबळांवर-मलिक

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसने शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक घेऊण महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घ्यायच्या नाहीत तसेच ओबीसी आरक्षणाबाबतची न्यायालयीन प्रकरणाची जबाबदारी छगन भुजबळ यांच्यावर सोपवण्यात आली आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षाच्या मंत्र्यांची व नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून त्या निवडणुकीत ओबीसींचे आरक्षण अबाधित राहिले पाहिजे यावर चर्चा झाली. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवाय निवडणूका नकोत ही पक्षाची सुरुवातीपासून भूमिका आहे आणि तीच कायम राहील असेही बैठकीत ठरले. बैठकी नंतर नवाब मलिक माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत न्यायालयीन लढा लढण्याची जबाबदारी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर देण्यात आल्याचेही बैठकीत ठरल्याचे मलिक यांनी सांगितले. पक्षातंर्गत होणार्‍या निवडणूकीसाठी होणारी सदस्य नोंदणी कार्यक्रमाचीही चर्चा यावेळी झाली. शिवाय ज्या आगामी निवडणूका होणार आहेत त्याची तयारी पक्षाने केली आहे. तसेच स्थानिक पातळीवर युती आणि आघाडी करण्यासाठी स्थानिक पातळीवरच निर्णय घ्यावेत असेही या बैठकीत ठरल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Share