राष्ट्रवादीचे नियोजित सर्व कार्यक्रम रद्द मलिकांची माहिती

मुंबई : राज्यात कोरोना दिवसेंदिवस झपट्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे काॅग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने मोठा निर्णय घेतला आहे. या महिन्यात पक्षाची होणारी सर्व नियोजित शिबिरे आणि सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

मात्र मंत्री आणि पालकमंत्री व संपर्कमंत्री त्या-त्या जिल्ह्यात जाऊन पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून माहिती घेतील. पक्षातंर्गत होणाऱ्या निवडणूकीसाठी होणारी सदस्य नोंदणी कार्यक्रमाचीही चर्चा यावेळी झाली. शिवाय आगामी ज्या निवडणूका होणार आहेत त्याची तयारी पक्षाने केली आहे असेही नवाब मलिक यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं.

Share