कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी बोलवली सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक

दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलवली आहे. तसेच या बैठकीत सर्व राज्यांच्या कोरोना आढावा घेणार असून काही सूचना देखील करणार आहेत. आज दुपारी ऑनलाइन माध्यमातून ही बैठक होणार आहे. राज्यांमधील लसीकरण वाढवण्यासाठी आणखी लशीचा साठा मिळावा आणि इतर औषधांबाबत यावेळी राज्यांकडून मागणी केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्र सरकार सुद्धा लसीकरणासंदर्भातील काही निर्देश देणार असल्याची तसेच निर्बंधांबद्दल या बैठकीत महत्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. तसेच या बैठकीमध्ये पुन्हा निर्बंध कठोर करण्याबरोबरच देशभरामध्ये लॉकडाउन लावण्याच्या शक्यतेबद्दलही चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

या राज्यात रूग्ण संख्या जास्त-
१९ राज्यांमध्ये १० हजारहून अधिक ओमायक्रॉन कोरोना रुग्ण असून महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली, तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश, केरळ आणि गुजरात या राज्यांमध्ये करोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी बुधवारी दिली आहे.

Share