पंतप्रधानांच्या सुरक्षेवरुन काँग्रेस भाजपात ट्विटर वाॅर

**पंजाब-** हुसैनवाली येथील राष्ट्रीय शहीद स्मारकापासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर पंतप्रधान मोदी यांचा ताफा एका उड्डाण पुलावर पोहोचला. पण काही आंदोलकांनी रस्ता अडवला असल्याचं त्यावेळी समजलं. त्यामुळं पंतप्रधानांना उड्डाण पुलावर १५ ते २० मिनिटं अडकून राहावं लागलं. ही पंजाब सरकारची मोठी चूक असल्याच म्हंटल जात आहे.

https://twitter.com/ANI/status/1478695944589697025?s=20

 

दरम्यान फिरोजपूर येथे आयोजित सभेत पंतप्रधान येणार नसल्याची घोषणा करण्यात आली आणि या सभेला पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी संबोधित केले. तसेच त्यांनी या घटनेबाबत ट्विट करत म्हंटल आहे की , हे पंजाब सरकारचं मोठ अपयश आहे. तसेच हे पंजाबच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांचं अपयश आहे. जिथून पाकिस्तानची सीमा केवळ १० किलोमीटर अंतरावर आहे, अशाठिकाणी तुम्ही देशाच्या पंतप्रधानांना सुरक्षित रस्ता देऊ शकत नाही? तुम्हाला सत्तेवर राहायचा काही अधिकार नाही. तुम्ही सत्ता सोडायला हवी.

https://twitter.com/JPNadda/status/1478656182269067269?s=20

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पंजाब काँग्रेस सरकारवर या मुद्द्यावरून आरोप केला आहे. निवडणुकीत पराभवाच्या भीतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं नड्डा म्हणाले. तसेच पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी हे या प्रकरणी फोनवरून देखील कोणतही उत्तर दिल नाही.असा आरोप नड्डा यांनी केला आहे. https://twitter.com/rssurjewala/status/1478683243893465091?s=20

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांना प्रत्युत्तर देत काँग्रेस नेते रणदीप सिंग सुरजेवाला यांनी एक ट्विट केल आहे . सुरजेवाला यांनी म्हंटल आहे की, दौरा रद्द होण्याच मुख्य कारण रिकाम्या खुर्च्या आहेत विश्वास नसेल तर हा व्हिडिओ बघा. वायफळ वक्तव्यं करण्यापेक्षा स्वतःच्या शेतकरी विरोधी मानसिकतेचा स्वीकार करून आत्मपरीक्षण करा. पंजाबच्या लोकांनी सभेपासून दूर राहून अहंकारी सत्तेला आरसा दाखवला आहे.” असं सुरजेवाला यांनी ट्विटमध्ये म्हंटल आहे.

तसेच भाजपच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनी देखील पत्रकार परिषद घेत पंजाब सरकारला काही प्रश्न विचारले आहेत. या सर्व सुरक्षेच्या त्रुटीला पंजाब सरकार जबाबदार असल्याच त्यांनी म्हंटल आहे.

Share