मुंबई- गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने डोकं वर काढल आहे. त्यात कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे संसर्गाचा धोका वाढत असतांना राज्यात निर्बंध लावण्यात आले आहे. राज्यात रात्रीची संचार बंदी लागू करण्यात आली असून तेसच नव वर्षाच्या स्वागतासाठी पार्टी आणि सेलिब्रेशनवर राज्य सरकारने बंदी घातली आहे.याच पार्श्वभूमीवर मुंबईत ३० डिसेंबर ते ७ जानेवारी पर्यंत जमाव बंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे.
मुंबईमध्ये लागू करण्यात आलेल्या या आदेशामुळे आता पाचपेक्षा अधिक व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमता येणार नाहीय. करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच पार्श्वभूमीवर मुंबईत नववर्षांच्या स्वागतानिमित्त मोकळय़ा किंवा बंदिस्त जागेमध्ये पार्टी, स्नेहसमारंभ किंवा अन्य कोणत्याही उपक्रमाच्या आयोजनास बंदी करण्यात आली आहे.