‘या’ ११ खासदारांना यंदाचा ‘संसदरत्न’ पुरस्कार जाहिर !

दिल्ली- प्राइम पॉइंट फाऊंडेशनने ‘संसद रत्न पुरस्कार २०२२’ साठी देशातील ११ खासदारांची निवड केली आहे. यामध्ये राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, बीजेडीचे अमर पटनायक यांचा समावेश आहे. याशिवाय भाजपचे तामिळनाडूचे खासदार एच.व्ही. हांडे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एम. वीरप्पा मोईली यांची जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

प्राइम पॉइंट फाऊंडेशनने मंगळवारी सांगितले की संसदेच्या अर्थ, कृषी, शिक्षण आणि कामगार मंत्रालयांच्या चार समित्यांना त्यांच्या योगदानाबद्दल सन्मानित केले जाईल. सन्मानित करण्यात येणाऱ्या ११ खासदारांपैकी आठ लोकसभेचे आणि तीन राज्यसभेचे आहेत. 

संसदरत्न पुरस्काराचे मानकरी-

तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगता रॉय (पश्चिम बंगाल), काँग्रेसचे खासदार कुलदीप राय शर्मा (अंदमान आणि निकोबार बेटे), आणि भारतीय जनता पक्षाचे  खासदार विद्युत बरन महतो (झारखंड), हीना विजयकुमार गावित (महाराष्ट्र) आणि सुधीर गुप्ता (मध्य प्रदेश) क्रांतिकारी समाजवादी पक्षचे एन के प्रेमचंद्रन आणि शिवसेनेचे श्रीरंग अप्पा बारणे  यांना या १७ व्या लोकसभेतील कामगिरीबद्दल संसदरत्न पुरस्कार बहाल करण्यात येणार आहे.

Share