परमबीर सिंग यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा !

दिल्ली-  मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. येत्या ९ मार्चपर्यंत परमबीर सिंग यांच्याविरोधातील चौकशी थांबवण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. परमबीर सिंग आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा सहभाग असल्याचा आरोप असणाऱ्या आर्थिक घोटाळ्याच प्रकरण म्हणजे बरीच गोंधळाची बाब असल्याचं देखील न्यायालयानं यावेळी नमूद केले. तसेच, परमबीर सिंग यांच्याविरोधातील सर्व प्रकरणांचा तपास सीबीआयकडे हस्तांतरीत करायचा किंवा नाही, याविषयी देखील निर्णय देणार असल्याचं न्यायालयाने यावेळी नमूद केले आहे.

परमबीर सिंग यांच्याविरोधात सध्या सुरू असलेल्या सर्व प्रकरणांचा तपास सीबीयकडे सोपवावा किंवा नाही, याविषयी आम्ही लवकरच निर्णय घेऊ, असं सर्वोच्च न्यायालयाने यावेळी सांगितलं आहे. परमबीर सिंग यांना अँटिलियाबाहेर स्फोटकं सापडल्याच्या प्रकरणानंतर झालेल्या तपासादरम्यान मुंबई पोलीस आयुक्तपदावरून हटवण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर करण्यात आलेल्या आर्थिक घोटाळ्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर त्यांना निलंबित करण्यात आलं आहे.

Share