मनसे टेलिकॉम शाखेच्या आंदोलनानंतर १३ व्या महिन्याची लूट थांबली !

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण टेलिकॉम सेनेने २८ दिवसांऐवजी ३० दिवसांच्या रिचार्ज प्लॅनच्या संदर्भात ट्राय अर्थात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण यांना पत्र लिहिले होते तसेच या मागणीवर सविस्तर विचार करण्याची विनंती केली होती. तसेच लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास कंपन्यांच्या या मनमानी निर्णयाविरोधात आंदोलन पुकारण्याची हाक सुद्धा एमएनटीएस अध्यक्ष सतीश रत्नाकर नारकर यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती.

मात्र आता महाराष्ट्र नवनिर्माण टेलिकॉम सेनेच्या अर्थात एमएनटीसच्या या मागणीची दाखल खुद्द ट्राय’ने घेतली असून २८ दिवसांऐवजी ३० दिवसांची सेवा पुरविणे टेलिकॉम कंपन्यांना बंधनकारक असणार आहे असा अध्यादेशाचं ट्रायने काढला आहे. याच मागणीला अनुसरून महाराष्ट्र नवनिर्माण टेलिकॉम सेनेने टेलिकॉम कंपन्यांशी पत्रव्यवहार करून अधिकाऱ्यांशी भेटण्याची वेळ मागितली होती.

तसेच ट्रायच्या आदेशानुसार २८ दिवसांची सेवा पुरवण्यात येत का ? या संदर्भात विचारणा सुद्धा करण्यात आली होती मात्र कंपन्यांनी या संदर्भात उत्तर देणे टाळाटाळ केले होते म्हणूनच या विषयी थेट एनएमटीसीने ट्रायशी पत्रव्यवहार करून जाब विचारला होता. मात्र अखेर एमएनटीस’च्या मागणीचा विचार करून तसेच ग्राहकांकडून येत असलेल्या तक्रारीवरून ट्रायने हे मोठे पाऊल उचलत कंपन्यांच्या मनमानी कारभारावर टाच आणली आहे. तसेच एमएनटीसच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या आंदोलनाचे हे यश आहे.

आज संपूर्ण टेलिकॉम क्षेत्राशी निगडित ग्राहकांचा विचार केला तर डिसेंबर २०२१ च्या अखेरीस, भारतात ११८.९६ दशलक्ष मोबाइल नेटवर्क वापरकर्ते आहेत. ट्रायच्या म्हणण्यानुसार, आज रिलायन्स जिओच्या एकूण ग्राहकांची संख्या ४२.६५ कोटीच्या वर आहे तर Vi ची एकूण ग्राहक संख्या २६.९० कोटींवर गेली आहे तसेच भरती एअरटेलचा आकडा सुद्धा ३५.३९ लाखांवर गेला आहे. आज या सर्व एकूण ग्राहकांचा विचार केला आहे ११४.९४ कोटींच्या वर टेलिकॉम नेटवर्क वापरकर्ते आहेत.

या सर्वांचा या ट्रायच्या नव्या नियमांमुळे फायदा होणार असून एका महिन्याचा रिचार्जचे पैसे वाचणार आहेत आणि हे फक्त आणि फक्त एमएनटीएसच्या आंदोलनामुळे यशस्वी झाले आहे. आज ११४.९४ कोटी ग्राहकांचे एका महिन्याचे जरी पैसे वाचले तरी ११४.९४ ग्राहकांचे कमीतकमी २०० रूपये प्लॅनप्रमाणे एका महिन्याचे पैसे जरी वाचले तर वर्षभरात २२,९८८ कोटी रुपयाची सामान्य नागरिकांची होणारी लूटमार थांबू शकते.

Share