ठाणे : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाडांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आता आव्हाडांकडून जामिनासाठी अर्जही दाखल करण्यात आला आहे. या जामीन अर्जावर काही वेळातच सुनावणी होणार आहे. ठाण्यातल्या विवियाना मॉलमध्ये राडा केल्याप्रकरणी आव्हाडांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
प्रकरण नेमकं काय?
जितेंद्र आव्हाड यांनी ‘हर हर महादेव’ चित्रपट बंड पाडल्यानंतर त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून एका प्रेक्षकाला मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांसह १०० कार्यकर्त्यांवर वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी शुक्रवारी (११ नोव्हेंबर) राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यासह ११ ते १२ जणांना वर्तकनगर पोलिसांनी अटक केली.