गजाभाऊंना म्हातारपणात म्हातारचळ लागलंय – चंद्रकांत खैरे

औरंगाबाद : ठाकरे गटाचे खासदार  गजानन किर्तीकर यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला आहे. त्यानंतर किर्तीकर यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहेत. ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनीही किर्तीकर यांच्यावर सडकून टीका केलीय.

चंद्रकांत खैरे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, गजाभाऊंना म्हातारपणात म्हातारचळ लागली आहेत. पक्षात काही अडचणी असतील तर त्या बोलायच्या होत्या असं गद्दार लोकांमध्ये सामील होणं चुकीच आहे अशी खोचक टीका चंद्रकांत खैरे यांनी केली आहे.

पुढे खैरे बोलताना म्हणाले की, गजाभाऊंनी पक्ष सोडला याचं मला खूप दु:ख झालं आहे. गजाभाऊ आमचे मार्गदर्शक होते. त्यांनी सुरुवातीच्या काळात औरंगाबाद आणि जालन्यात खूप काम केलं. आम्हाला त्यांनी घडवलं. त्यांना पक्षात काही गोष्टी खटकत होत्या तर त्यांनी सांगायला हवं होतं. अशा गोष्टींसाठी पक्ष सोडल्याने मला खूप दु:ख झालं. गजाभाऊंनी बाळासाहेबांसोबत काम केलं होतं. दोनदा खासदार झाले होते. पक्षाने त्यांना पाचवेळा आमदार केलं होतं. मंत्रीपदही दिलं होतं. अजून काय हवं होतं. इतकं पक्षांनी दिल्यानंतरही या वयात ते गद्दारांच्या बरोबर गेले. हे मला पटलं नाही. असं चंद्रकांत खैरे बोलताना म्हणाले आहेत.

Share