नागपुर : तुमच्या आयुष्यात झालेली दुर्घटना जीवनात अंध:कार निर्माण करणारी आहे. मात्र सकारात्मकवृत्तीने बाहेर पडणे आवश्यक आहे. शासन तुमच्या कायम पाठीशी आहे. निराश न होता पुढील मार्गक्रमण करा, आकाशी झेप घ्या, असे भावनिक आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केलेल.
कोरोना महामारीमध्ये ज्यांचे आई-वडील मृत्यूमुखी पडले अशी अनाथ बालकांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमातंर्गत ऑनलाईन संवाद साधला. नागपूर जिल्ह्यात दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची संख्या ७९ आहे. त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात पंधरा लाखाचे पॅकेज मंत्री महोदयांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी व्यासपीठावर आमदार विकास कुंभारे, टेकचंद सावरकर, जिल्हाधिकारी आर.विमला, महिला व बाल विकास विभागाचे विभागीय उपायुक्त रवी पाटील उपस्थित होते.
दु:खाची भरपाई होऊ शकत नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अतिशय जिव्हाळ्यातून ही योजना आणली आहे. मुलांना त्यांच्यासोबत घडलेल्या अघटीतातून बाहेर काढण्यासाठी, निराशेतून प्रकाशाकडे नेण्यासाठी, संकटावर मात करुन यशस्वी होण्यासाठी, अतिशय बारकाईने ही योजना आखण्यात आली असून कोणत्याच निराधाराला शासन दुर्लक्षित करणार नाही. त्यामुळे मुलांनी सकारात्मक वृत्तीने आपल्या आयुष्याचे नियोजन करावे, असे आवाहनही त्यांनी केले. तत्पूर्वी प्रधानमंत्र्यांनी आपल्या भावपूर्ण निवेदनात बालकांना तुमच्या दु:खाची भरपाई होऊ शकत नाही. मात्र ज्यांच्या आयुष्यात संघर्ष आला. त्यानाच मोठे होता आले. त्यामुळे हार न मानता लढण्याचे आवाहन केले. केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी सेवा हेच कर्म माणणाऱ्या शासनाची ही भावनिक पूर्तता असल्याचे सांगितले.
आज #8YearsOfSeva के अवसर पर प्रधानमंत्री श्री @narendramodi जी ने #PMCaresForChildren योजना के तहत लाभ जारी किए। उनकी वर्चुअल उपस्थिति में आयोजित इस कार्यक्रम में प्रदेश के सदस्यों के साथ शामिल हुआ। pic.twitter.com/cjgKf00tlu
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) May 30, 2022