नवी दिल्लीः कोरोना आणि ओमाक्रॉनंचा देशात मोठ्या प्रमाणात होत आहे. चार दिवसापासून कोरोनाच्या रुग्णसंख्यात वाढ होत आहे. दररोज अडीच लाखांच्या पुढेच कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. अशा स्थितीत कोरोना रुग्णांच्या संख्येने उच्चांक गाठला आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, काही ठिकाणी रुग्णसंख्येत घटही होत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे आता इथून पुढे कोरोना रुग्णसंख्या कमी कमी होत जाईल का? असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे .
गेल्या चोवीस तासात कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट झाल्याचे दिसून आले आहे. देशात गेल्या २४ तासात २ लाख ३८ हजार ०१८ रुग्णांची नोंद झाली आहे. सोमवारच्या तुलनेत आज आलेल्या आकडेवारीमध्ये २० हजार रुग्णांची घट नोंदवण्यात आलीय. तर, मृतांची संख्या देखील कमी झालीय. दिवसभरात ३१० जणांचा कोरोनामुळं मृत्यू झालाय. २४ तासात १ लाख ५७ हजार ४२१ जण कोरोना मुक्त झाले आहेत.
India reports 2,38,018 COVID cases (20,071 less than yesterday), 310 deaths, and 1,57,421 recoveries in the last 24 hours.
Active case: 17,36,628
Daily positivity rate: 14.43%8,891 total Omicron cases detected so far; an increase of 8.31% since yesterday pic.twitter.com/CaYmWHCPKX
— ANI (@ANI) January 18, 2022
देशात सध्या १७ लाख ३६ हजार ६२८ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. तर पॉझिटिव्हीटी रेट देखील कमी होत १४.४३ वर आला आहे. देशातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या ८८९१ वर गेली आहे.
महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची स्थिती काय?
सोमवारी राज्यात ३१ हजार १११ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर २४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसभरात २९ हजार ०९२ रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत ६८ लाख २९ हजार ९९२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट ९४.३ टक्केवर पोहोचला आहे.तर, राज्यातील मृत्यूदर १.९५ वर पोहोचला आहे.