पटोलेंना केवळ शारीरिक उंची आहे, बौद्धिक उंची नाही- फडणवीस

मुंबई-  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या वक्तव्याने नवीन वादाला सुरुवात झाली आहे.  या वक्तव्यामुळे भाजपकडून जोरदार टिका केली जात आहे. यावर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खोचक टिका करत, पटोले केवळ शारिरीक उंचीने वाधले आहेत,त्यांना बौध्दिक उंची नाही .

नाना पटोले बडबडे आहेत. नाना पटोलेंचं काय अस्तित्व आहे, ते बडबडे व्यक्ती आहेत. त्यांना केवळ शारीरिक उंची आहे, बौद्धिक उंची नाही. बौद्धिक उंची असती तर त्यांच्या बोलण्याला उत्तर दिलं असतं. केवळ शारीरिक उंची असणाऱ्या व्यकीला थोडीच उत्तर दिलं जातं. असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

एकेकाळी स्वातंत्र्यलढ्यातील सहभागासाठी ओळखले जाणारे, आता केवळ सत्तेसाठी इतके रसातळाला गेले आहेत? काँग्रेस हा लोकशाही व्यवस्थेतील राजकीय पक्ष आहे की दहशत पसरवणारी संघटना? असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर देखील निशाणा साधला आहे.

तसेच पंतप्रधान मोदी यांचा ताफा २० मिनिटे खोळंबून राहतो, पण तेथील काँग्रेसचे मुख्यमंत्री साधी दखलसुद्धा घेत नाहीत. आता महाराष्ट्राचे काँग्रेस अध्यक्ष मी मोदींना मारू शकतो, शिव्या देऊ शकतो, असं विधान करतात. असंही फडणवीसांनी ट्विट केल आहे.

Share