युक्रेनमध्ये अडकलेले २५० विद्यार्थी मायदेशी परतले

 नवी दिल्लीः  सध्या रशिया व युक्रेन या देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे तिथे भितीदायक स्थिती निर्माण झाली आहे.या युद्धामुळे युक्रेनची हवाई वाहतूक पूर्णपणे बंद आहे. हवाई वाहतूक बंद असल्यामुळे अनेक भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले होते. त्यांना आता भारतामध्ये आणण्यात येत आहे. हवाई उड्डाण बंद असल्यामुळे थेट युक्रेनमधून विमानाचे उड्डाण शक्य नाही. त्यामुळे या विद्यार्थांना हंगेरी आणि रोमानियामध्ये आणून नंतर विमानाने भारतात आणले जात आहे. शनिवारी एक विमान भारतात दाखल झाले. त्यानंतर आज पहाटे देखील दुसरा विमान भारतामध्ये आले आहे.

आज सकाळी २५० विद्यार्थी रोमानियाहून सुखरुप भारतात परतले. दिल्ली विमानतळावर सकाळी त्यांचे स्वागत करण्यात आले. एअर इंडियाच्या दुसऱ्या विमानाने हे २५० विद्यार्थी भारतात आणले आहेत. ‘ऑपरेशन गंगा’ अंतर्गत युक्रेनध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

गेल्या चार दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. त्यामुळे युक्रेनमधील भारतीय नागरिकांची सुरक्षाही धोक्यात आली आहे. रशियाकडून सतत होणाऱ्या हल्यामुळे युक्रेमधील परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तसेच युक्रेनवर झालेल्या हल्ल्यांमुळे अनेक विद्यार्थी बंकरमध्ये राहत आहेत. तेथील परिस्थिती कठीण आहे. सरकारने आम्हाला वेळेवर बाहेर काढल्याबद्दल धन्यवाद, अशा प्रतिक्रिया युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांनी दिल्या आहेत.

Share