राज्यमंत्री बच्चू कडूंच्या विरोधात खटला चालवण्याचे राज्यपालांचे आदेश

मुंबई :  राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. कारण राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याविरोधात खटला चालवण्याचे आदेश दिले आहे. बनावट दस्ताऐवज बनवून शासकीय निधीचा अपहार केल्याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीने बच्चू कडू यांच्याविरोधात राज्यपालांकडे तक्रार केली होती. त्यानंतर राज्यपालांनी अकोला पोलीस अधीक्षकांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता बच्चू कडू यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.

नेमकं प्रकरण काय ?

शालेय शिक्षण राज्यमंत्री आणि अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्यावर रस्ते निधीबाबत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आलाय. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. बच्चू कडू यानी बनावट दस्ताऐवज बनवून अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांवर शासकीय निधी वळता करुन घेत अपहार केला, असा आरोप वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आलाय. याबाबतची सविस्तर माहिती राज्यपाल कोश्यारी यांना देण्यात आलीय. संबंधित कागदपत्रे तपासल्यानंतर आता राज्यपालांनी बच्चू कडू यांच्याविरोधात खटला चालवण्याचे आदेश दिले आहेत.

या प्रकरणात तत्कालीन जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांचंही नवा समोल आलं आहे. काही इतर जिल्हा मार्ग आणि ग्राम मार्ग हे शासन क्रमांक नसलेल्या ररत्यांच्या कामाची यादी जिल्हा परिषदेला पाठवून बच्चू कडू यांनी सरकारी निधीचा अपहार केल्याचं समोर आलं. याबाबतचे पुरावे वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर यांनी समोर आणले. त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी याबाबत राज्यपालांची भेट घेत योग्य कारवाईची मागणी केली होती.

Share