मुंबई : राज्यातील गृह विभागात लवकरच सात हजार पोलिसांची भरती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली.
विधानसभेत लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, राज्यातील विविध शहरांमध्ये पोलिस विभागात मनुष्यबळ कमी पडत आहे. मनुष्यबळाची आवश्यकता लक्षात घेऊन लवकरच सात हजार पोलिसांची भरती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Instructions for recruiting 7000 police personnel are given.
Process for another 7000 will also start.
7000 पोलिस भरतीचे आदेश दिले आहेत.
आणखी 7000 पोलिस भरतीची प्रक्रिया सुरू करण्यास सांगण्यात आले आहे.
(लक्षवेधी, विधानसभा।दि. 24 ऑगस्ट 2022)#Maharashtra #MonsoonSession pic.twitter.com/EEKR10uTVZ— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 24, 2022
तसेच एका अधिकाऱ्यांस एकाच पदावर अथवा शहरात जास्त काळ नियुक्ती दिली जाऊ नये, याबाबत दक्षता घेतली जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. याबाबत सदस्या मंदा म्हात्रे यांनी चर्चा उपस्थित केली होती.