‘५० खोके एकदम ओके’ ही घोषणा सत्ताधाऱ्यांना जिव्हारी लागली – अजित पवार

मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधी गटाच्या आमदारांमध्ये जोरदार राडा झाला. यावेळी शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. दरम्यान सत्ताधाऱ्यांना आमच्या घोषणा झोंबल्या आहेत अशी प्रतिक्रिया राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, विधिमंडळाचे अधिवेशनाचे कामकाज सुरु होण्यापूर्वी पायऱ्यांवर विरोधकांकडून घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात येते होते. यावेळी विरोधकांकडून ‘पन्नास खोके एकदम ओक्के’ ही घोषणा देण्यात आल्या आणि हीच घोषणा सत्ताधाऱ्यांना जिव्हारी लागली असून त्यातून हा धक्काबुक्कीचा प्रकार घडल्याची प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली. आम्ही सत्तेवर असतानाही विरोधीपक्षातील नेते विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत होते. मात्र, आम्ही त्यांना कधी अडवलेले नाही. परंतू आजचा प्रकार हा जाणीवपूर्वक घडवून आणाल आहे. आंदोलनादरम्यान, संपूर्ण महाराष्ट्रात ज्या पद्धतीने आमच्या घोषणा दाखवण्यात आल्या. त्यातून सत्ताधाऱ्यांना त्यांची प्रतिमा मलिन झाल्याची भीती निर्माण झाली असावी आणि म्हणूनच ‘चारोच्या मनात चांदणं’ अशा प्रकारातून हा प्रकार झाल्याचे अजित पवार म्हणाले.

Share