पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ कोरोना पॉझिटिव्ह

पुणे : पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत देखील महापौर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता  तिसऱ्या लाटेत देखील महापौर मुरलीधर मोहोळ यांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे.  स्वतः मोहोळ यांनी आपल्या ट्विटर हँडलद्वारे याबाबत माहिती दिली आहे.

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले की, कोरोनाची काहीशी लक्षणे जाणवल्यावर RT-PCR चाचणी केली असता माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माझी प्रकृती स्थिर असून संपर्कात आलेल्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने चाचणी करुन घ्यावी. आपल्या सदिच्छांच्या पाठबळावर लवकरच बरा होऊन आपल्या सेवेत असेल अशी माहिती त्यांनी ट्विटर दिली आहे.

पुण्यात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ५,५२१ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर तीन जणांना मुत्यू झाला आहे.  पुण्याची कोरोना रुग्णांची संख्या  ६ लाख २० हजार ५४८ वर गेली आहे. तसेच मूत्यांची संख्या  ९,२०९ वर गेली आहे. दिलासादायक बाब म्हणजे, या कालावधीत ६,३३३ रुग्ण बरेही झाले आहेत. आतापर्यंत एकूण ५,६६,८८७ रिकव्हर झाले आहेत. पुण्यात एकूण ४४,४५२ सक्रिय रुग्ण आहेत.

Share