आदित्य ठाकरेंनी ट्विटरवरुन मंत्रिपदाचा उल्लेख हटवला

मुंबई : शिवसेनेचे नेते आणि महाविकास आघाडी सरकरामधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कालपासून पक्षाविरोधात बंड पुकारला आहे. तेव्हापासून राज्याच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहेत. अशातच आता राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटरवरुन मंत्रिपदाचा उल्लेख हटवला आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरुन बायो हटवल्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

दरम्यान, सुरतमध्ये मुक्काम ठोकल्यानंतर एकनाथ शिंदे भल्या पहाटेच ३५ आमदारांना घेऊन गुवाहाटीला तळ ठोकून आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत आणखी आमदार येणार असा दावा केला होता. त्यांचा हा दावा आता खरा ठरला आहे. गुवाहाटी विमानतळावर आणखी एक सेनेचा आमदार एकनाथ शिंदेंचा तंबूत पोहोचला आहे. आमदार योगेश रामदास कदम हे गुवाहाटीमध्ये दाखल झाले आहे. गुहाहटी विमानतळावर भाजपा आणि सेनेचे काही जण योगेश कदम यांना घेण्यासाठी थांबलेले आहे. तर त्यांच्यासोबत संजय राठोड हे सुद्धा पोहोचले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंचा गटाची ताकद आणखी वाढली आहे.

Share