संजय राऊत म्हणतात,महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या…

मुंबई : शिवसेनेचे नेते आणि महाविकास आघाडी सरकरामधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कालपासून पक्षाविरोधात बंड पुकारला आहे. तेव्हापासून राज्याच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहेत. अशातच आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सूचक ट्वीट केलं आहे.

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने सुरु आहे, असं ट्विट राऊतांनी केलं आहे. म्हणजेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देणार असल्याचे संकेतच संजय राऊतांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी जर राजीनामा दिला तर संपूर्ण मंत्रिमंडळच बरखास्त होईल.

 

Share