बंडखोर आमदारांसह एकनाथ शिंदे उद्या मुंबईत परतणार

गुवाहाटी : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आपल्या बंडखोर आमदारांसह उद्या मुंबईत दाखल होणार आहे. याबाबत स्वत: एकनाथ शिंदे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. एकनाथ शिंदे आज सकाळी कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. त्यानंतर शिंदे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. ‘मी आताच कामाख्या देवीचं दर्शन घेतलं आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या समाधानासाठी, सुखासाठी आणि समृद्धीसाठी मी देवीचे आशीर्वाद घेतले,असं ते म्हणाले.

राज्यपालांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी ४८ तास दिले आहेत. त्यानुसार उद्याच विशेष अधिवेशन घेऊन संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देण्यात आलेत. राज्यपालांनी तसे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवलं आहे. त्यामुळे उद्या ठाकरे सरकारची अग्निपरीक्षा आहे. उद्याच ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करावं लागेल. सदस्यांना आपापल्या जागेवर उभं करूनच त्यांची शिरगणती केली जाईल. राज्यपालांच्या आदेशांनंतर आता ठाकरे सरकारचं काऊंटडाऊन सुरु झाले आहे.

दरम्यान, राजीनामा न देता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे जाणार आहेत, अशी सूत्रांची माहिती आहे. मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांना पाठिंबा देण्यात आला आहे. तर दुसरीकडे शिवसेना सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या पवित्र्यात आहे. बहुमत चाचणी सांगितल्यास शिवसेना सर्वोच्च न्यायालयात तयारी करत होती. आता परिस्थिती जैसे थे ठेवली जात नसल्याविरोधात महाविकास आघाडी सरकार याचिका दाखल करण्यासाठी तयारी करत आहे. बहुमत चाचणीविरोधात शिवसेना न्यायालयात दाद मागणार आहे.

Share