हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका प्रवेशासाठी मुदतवाढ

मुंबई : हातमाग व वस्तोद्योग तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रमासाठी केंद्र शासनाच्या भारतीय हातमाग तंत्रज्ञान संस्था बरगढ आणि वेंकटगिरी येथे शैक्षणिक सत्र २०२२-२३ साठी अनुक्रमे १४ आणि २ जागांवर महाराष्ट्र राज्यातून प्रवेश देण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांना केंद्र शासनाने अर्ज पाठविण्यात ११ जुलै २०२२ पर्यंत मुदतवाढ दिली आहे, असे वस्तोद्योग आयुक्त शीतल तेली-उगले यांनी कळविले आहे.

तीन वर्षीय हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राकरिता केंद्र शासनाच्या भारतीय हातमाग तंत्रविज्ञान संस्था  बरगढ (ओडिशा) येथे १४ आणि वेंकटगिरी येथे २ जागांवर महाराष्ट्र राज्यातून प्रवेश देण्यात येणार आहे. या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्यासाठी इच्छुक उमेदवारांना नागपूर, सोलापूर, मुंबई आणि औरंगाबाद येथील वस्त्रोद्योग विभागाच्या प्रादेशिक उपायुक्तांमार्फत विहित नमुन्यातील अर्ज आता ११ जुलै २०२२ पर्यंत पाठवता येतील. प्रवेश अर्जाचा नमुना आणि इतर माहिती वस्त्रोद्योग विभागाच्या http://www.dirtexmah.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध असून सर्व प्रादेशिक उपायुक्त कार्यालयात देखील उपलब्ध आहे, असेही आयुक्त श्रीमती तेली-उगले यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

Share