मुंबई : मनी लॉंड्रिग प्रकरणात अटकेत असलेले माजी पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. सचिन वाझेने सीआरपीसी कलम ८८ अंतर्गत जामीनाचा अर्ज दाखल केला होता. सचिन वाजे यांच्या जामीन अर्जाला ईडीने विरोध दर्शवला होता. ईडीच्या प्रकरणात सचिन वाझेला जामीन मिळाला असला तरी इतर प्रकरणात त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली असल्याने वाझेाचा मुक्काम सध्यातरी तुरुंगातच राहणार आहे.
A Mumbai court today has granted bail to dismissed Mumbai cop Sachin Waze in a money laundering case, where former cabinet minister Anil Deshmukh is also an accused. @dir_ed #SachinWaze #AnilDeshmukh pic.twitter.com/C5ySSt34I5
— Bar & Bench (@barandbench) November 18, 2022
बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना कथित भ्रष्टाचार प्रकरणात माफीचा साक्षीदार करण्यात आले आहे. या कथित भ्रष्टाचार प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह अन्य आरोपींविरोधात आपल्याकडे असलेली माहिती देण्याची तयारी सचिन वाझेंनी दाखवली आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचे पत्र ठेवलेली स्कॉर्पिओ गाडी बेवारस सोडण्यात आल्याच्या तसेच त्या गाडीचा मालक मनसूख हिरेनच्या अचानक मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे सहायक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझे, त्यांचा सहकारी रियाझ काझी आणि पोलीस निरिक्षक सुनील मानेंला एनआयएकडून प्रथम अटक करण्यात आली होती.
दुसरीकडे ईडीने सचिन वाझे, अनिल देशमुख आणि इतरांविरोधात मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. सीबीआयने भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सचिन वाझे, अनिल देशमुख आणि इतर दोघांना अटक केली होती. आपण अनिल देशमुख यांच्या आदेशानुसार मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटकडून पैसे गोळा केल्याचे सचिन वाझेंनी