भारत-न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी-२० सामना रद्द

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी २० सामना आज वेलिंग्टन येथे रंगणार होता. वेलिंग्टनमध्ये तुफान पाऊस पडल्यामुळे हा सामना रद्द करण्यात आला आहे.  विशेष म्हणजे सामना एकही चेंडू न टाकता रद्द करावा लागला. नाणेफेकीवेळीच पावसाने हजेरी लावली. त्यामुळे दोन्ही संघ पॅव्हेलियनमध्येच हतबल होऊन बसले होते.

दरम्यान, मालिकेतील दुसरा सामना हा रविवारी माऊंट माऊनगनुई येथे खेळवला जाणार आहे. तेथील हवामान अंदाज देखील फारसा काही चांगला नाही. मात्र दोन दिवसात हवामानात काही बदल होईल अशी आशा करायला काही हरकत नाही.

भारत-न्यूझीलंड टी-२० आणि ODI मालिकेचे वेळापत्रक

पहिली टी-२०: १८ नोव्हेंबर २०२२, दुपारी १२ वाजता (पावसामुळे रद्द)

दुसरी टी-२० : २० नोव्हेंबर २०२२, दुपारी १२ वाजता

तिसरी टी-२० : २२ नोव्हेंबर २०२२, दुपारी १२ वाजता

पहिला एकदिवसीय सामना : २५ नोव्हेंबर २०२२, सकाळी ७ वाजता

दुसरा एकदिवसीय सामना : २७ नोव्हेंबर २०२२, सकाळी ७ वाजता

तिसरा एकदिवसीय : ३० नोव्हेंबर २०२२, सकाळी ७ वाजता

Share