दिल्ली- क्रीडाविश्वातील ऑस्कर मानला जाणाऱ्या लॉरियस पुरस्काराबाबत नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. टोक्यो ऑलिम्पिमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकलेला भालाफेकपटू नीरज चोप्राला ‘लॉरियस वर्ल्ड ब्रेकथ्रू ऑफ द इयर’ या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. हे नामांकन मिळवणारा नीरज तिसरा भारतीय ठरला आहे . यापूर्वी २०१९ मध्ये कुस्तीपटू विनेश फोगाट आणि २०११ मध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर या दोघांना हे नामांकन मिळाले होते. सचिन लॉरियस क्रीडा पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला होता.
Neeraj Chopra nominated for Laureus World Breakthrough of the Year Award
Read @ANI Story | https://t.co/2nRECmQi1v#NeerajChopra pic.twitter.com/bCHoiu5p6T
— ANI Digital (@ani_digital) February 2, 2022
नीरजने ऑलिम्पिकमध्ये अंतिम स्पर्धेत ८७.५८ मीटर भाला फेकत ट्रॅक अँड फील्डमध्ये देशासाठी पहिले पदक जिंकले होते. ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा नीरज हा भारताचा दुसरा खेळाडू आहे. त्याआधी नेमबाज अभिनव बिंद्राने २००८च्या बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले होते. या पुरस्कारासाठी नामांकन मिळाल्याने मला खूप आनंद होत आहे. टोक्योमध्ये मी जे काही साध्यं केलं, त्याची क्रीडाविश्वात अशी ओळख होणे, ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे”, असे नीरजने म्हटले आहे. नीरजला नुकतचं पद्मश्री पुरस्कारही जाहीर झाला आहे. त्याआधी नीरजला परम विशिष्ट सेवा पदक देण्याची घोषणा देखील करण्यात आली आहे.