केंद्र सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये,’या’ देशातून येणाऱ्या प्रवाशांना RT-PCR अनिवार्य

नवी दिल्ली : जगभरात कोरोना रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. या पार्शभुमीवर केंद्र सरकार सतर्क झालं आहे. चीन, जपान, कोरिया आणि थायलंडमधून येणाऱ्या प्रवाशांचे थर्मल स्कॅनिंगही केले जाईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी दिलेल्या माहितीनुसार, चीन, जपान, कोरिया आणि हाँगकाँग येथून येणाऱ्या सर्व विमानांचे थर्मल स्कॅनिंग केले जाणार आहे. तसेच वरील पाच देशातून भारतात दाखल होणारी कोणतीही व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास त्याला क्वारंटाईन करण्यात येणार असल्याचेही मांडविया यांनी स्पष्ट केले आहे.

विमानातून उतरताना प्रत्येक प्रवाशाला कोरोना नियमांचे पालन करावे लागणार आहे. विमानतळाच्या एंट्री पॉइंटवर सर्व प्रवाशांची थर्मल स्क्रीनिंग केली जाणार असून, थर्मल स्क्रिनिंग दरम्यान प्रवाशांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्याला वेगळे करून उपचारासाठी पाठवले जाईल. संबंधित रूग्ण पॉझिटिव्ह आढळल्यास त्यांना क्वारंटाइन केले जाणार आहे.

Share