मुख्यमंत्र्यांविरोधात अपशब्द वापरल्याप्रकरणी राष्टवादीच्या नेत्याला होणार अटक

कल्याण : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात अपशब्द वापरणं राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांना चांगलंच भोवण्याची शक्यता आहे. आनंद परांजपे यांच्या विरोधात भारतीय दंड विधान १५३, ५०१, ५०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. आनंद परांजपे यांच्याविरोधात कल्याण डोंबिवलीतील विविध चार पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामुळे त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात अपशब्द वापरल्यानं शिंदे गट (बाळासाहेबांची शिवसेना) चांगलीच आक्रमक झाली आहे. शिंगे गटाकडून . कल्याणमधील बाजारपेठ आणि कोळसेवाडी, डोंबिवलीतील रामनगर आणि मानपाडा पोलीस ठाण्यात आनंद परांजपे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. या तकारीनुसार आता परांजपे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

काय म्हणाले होते आनंद परांजपे
मुख्यमंत्री ज्याला तुम्ही चाणक्य समजत आहात, तोच तुमचा टायटॅनिक करायला कारणीभूत ठरणार आहे, असं आनंद परांजपे म्हणाले होते. तर ही आमची वैचारिक लढाई आहे. आमच्यावर ज्यांनी गु्न्हे दाखल केले तेच खरे गुन्हेगार आहेत, आंदोलन करताना आम्ही काही घोषणा दिल्या. त्या असंसदीय नव्हत्या. कोणाची बदनामी त्यातून केली नाही, असंही आनंद परांजपे म्हणाले आहेत.

Share