प्रचंड मताने मी विजयी होऊ शकतो; कराळे गुरुजी

आपल्या वैदर्भीय बोलीभाषेतून स्पर्धापरीक्षेचे धडे देणारे नितेश कराळे गुरुजी हे आता महाराष्ट्राच्या घराघरांत पोचले आहेत. वर्ध्यातल्या कराळे मास्तरांनी वऱ्हाडी बोली भाषा आणि शिक्षण यांचा सुरेख मेळ घातला असून हेच मास्तर आता हॉटसीटवर बसून ‘कोण होणार करोडपती’मध्ये प्रश्नांची उत्तरं देणार आहेत. येत्या शनिवारच्या विशेष भागात नितेश कराळे गुरुजी सहभागी होणार असून त्यांच्यासह कर्नल सुरेश पाटील हेही सहभागी होणार आहेत. युट्यूबवर लोकप्रिय ठरलेल्या कराळे गुरुजींना या मंचावरून ऐकणं ही प्रेक्षकांसाठी निश्चितच पर्वणी ठरणार आहे. स्पर्धापरिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अस्सल वैदर्भीय बोलीभाषेतून मार्गदर्शन करणारे नितेश कराळे गुरुजी आता एका नव्या वाटेवर चालण्यासाठी सज्ज झाले आहेत. विद्यार्थ्यांचे लाडके कराळे गुरुजी आता राजकारणात येण्यासाठी सज्ज झाले आहेत. सध्या लोकसभा निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या रणांगणात उरतण्याची तयारी कराळे गुरुजींची आहे. अशात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटण्यासाठी नितेश कराळे पुण्यात दाखल झाले आहेत. आज शरद पवार विविध मतदारसंघाचा आढावा घेत आहेत. अशातच कराळे गुरुजी शरद पवारांना भेटण्यासाठी पुण्यात आले आहेत.

नितेश कराळे हे लोकसभा लढण्यास उत्सुक आहेत. वर्धा लोकसभा मतदारसंघातून आपल्याला तिकीट देण्यात यावं, अशी कराळे गुरुजींची मागणी आहे. याचबाबत चर्चा करण्यासाठी ते आज पुण्यात आहेत. थोड्याच वेळात शरद पवार आणि कराळे गुरुजी यांची भेट होणार आहे.

Share